बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या आगामी सिनेमा थलायवी मध्ये तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. अशातच आता अशी माहिती समोर आली आहे की, आणखी एका आगामी सिनेमात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसू शकते.
एका इंग्रजी रिपोर्टनुसार हा सिनेमा एखादं बायोपिक नाही, तर एक पॉलिटिकल ड्रामा सिनेमा असेल. अनेक प्रसिद्ध चेहरे तिच्या या आगामीचा हिस्सा असतील असंही कंगनानं सांगितलं आहे. रिपोर्टनुसार, कंगना म्हणाली की, आम्ही या प्रोजेक्टवर काम करत असून याची स्क्रिप्ट फायनल स्टेजमध्ये आहे.
View this post on Instagram
कंगना म्हणाली, हे इंदिरा गांधी यांचं बायोपिक नसून एक ग्रँड पीरियड सिनेमा आहे. हा सिनेमा आपल्या पिढीला भारताची सोशियो-पॉलिटिकल रचना समजण्यास मदत करेल. भारतीय राजकीय इतिहासातील सर्वात आयकॉनिक लिडरची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे. कंगानं असंही सांगितलं की, हा सिनेमा एका पुस्तकावर आधारीत सिनेमा आहे.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.
Discussion about this post