बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांचा बहुचर्चित सिनेमा लक्ष्मी (After ‘Lakshmi’) हा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 9 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. यानंतर आता याच विषयासारखा एक सिनेमा मिलिंद सोमन देखील बनवणार आहे. ट्विट करत मिलिंदनं या बाबत(After ‘Lakshmi’) माहिती दिली आहे.
बॉलिवूड स्टार, फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमन (Milind Soman) यानं सोशलवर एक फोटो शेअर केला आहे. यात तो एका महिलेच्या लुकमध्ये दिसत आहे. डोळ्यात मस्करा, मोठे, केस, कपाळावर सिंदूर, नाकात सुंदर अशी नथ असा काहीसा त्याचा लुक दिसत आहे.
Spent the last few days in Karjat near Mumbai, now off to Chennai 🙂 I know its not Holi but when you have the opportunity to act, you don't question time and space .. pic.twitter.com/wjC16RLnBQ
— Milind Usha Soman (@milindrunning) November 10, 2020
अद्याप तरी सगळी माहिती समोर आलेली नाही. परंतु मिलिंद काही तरी धमाकेदार करणार आहे एवढं मात्र नक्की आहे. मोठ्या ब्रेकनंतर तो कमबॅक करताना दिसणार आहे. कॅप्शनमध्ये त्यानं थोडक्यात यावर भाष्य केलं आहे. याबद्दल खूप एक्साईड देखील आहे. मिलिंदनं शेअर केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मिलिंदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या फोर मोर शॉट्स प्लिज या वेब सीरीजच्या दोन्ही सीजनमध्ये तो झळकला होता. मिलिंदनं करिअरची सुरुवात मॉडेलिंगनं केली होती.
Discussion about this post