बॉलीवूडनामा ऑनलाइन – सेलिब्रेटींनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करावा आणि त्यावर चर्चेला उधाण यावं ही नित्याचीच बाब आहे. अभिनेता अर्जुन कपूर ने देखील आज इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. त्या फोटोत अर्जुनच्या हातात मंगळसूत्र पाहून “ही लग्नाची तयारी की नव्या सिनेमाची?” असा प्रश्न चाहत्यांना पडला; पण काही लोकांनी यातही मलायका अरोराला शोधले आहे.
‘तू फक्त बायको म्हणून घरी आली पाहिजे’; फॅन्सच्या टिप्पणीवर ‘फँड्री’फेम शालू ने दिले उत्तर
‘की अॅण्ड का’ चित्रपटाच्या वेळची एक आठवण…सेटला आणि माझ्या ऑनस्क्रिन ‘की’ला मिस करत आहे. हा चित्रपट माझ्या जवळचा आहे कारण तो मी माझ्या आईसाठी केला होता. करीना आणि बल्की सरांसोबत काम केल्यामुळे तर तो अधिकच जवळचा आहे. मला वाटतेय आपण याचा सिक्वेल करावा. काय म्हणतेस करीना? ,’ असे हा फोटो शेअर करताना अर्जुनने लिहिले.
View this post on Instagram
मलायका व अर्जुन कपूर दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता हे नातं कुणापासूनही लपून राहिलेले नाही. सध्या अर्जुन मलायकासोबतच अलिबागमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय. त्यांच्यासोबत रिया कपूर, मसाबा गुप्ताही व्हॅकेशनवर गेल्या आहेत. अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर गेल्या महिन्यातच त्याचा ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा लीड रोलमध्ये होती. अर्जुनने खरे तर ‘की अॅण्ड का’ या सिनेमाला ५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही पोस्ट टाकली. पण युजर्सनी या पोस्टचा संबंध मलायकाशी जोडला. ‘हे मंगळसूत्र मलायकासाठी तर नाही ना?’ असा सवाल एका युजरने त्याला केला. अन्य एका युजरने, ‘की अॅण्ड का’च्या सीक्वलमध्ये करिना नको, मलायका हवी’, असे लिहिले. ‘हे मंगळसूत्र मलायकाच्या गळ्यात बांध आणि संपव’, अशी कमेंट एका युजरने केली.
Discussion about this post