बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) 27 डिसेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत असतो. प्रत्येक वर्षी त्याच्या फार्म हाऊसवर बर्थडेची शानदार पार्टीही होते.
View this post on Instagram
परंतु आता अशी माहिती समोर येताना दिसत आहे की, समलान खान पहिल्यांदाच त्याचा वाढदिवस साजरा करणार नाहीये. तो त्याच्या फार्म हाऊसवर कोणत्या पार्टीचंही आयोजन करणार नाहीये. ही माहिती समोर आल्यानंतर आता त्याचे चाहते नाराज होण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
एका रिपोर्टनुसार सलमान खान सध्या त्याच्या शुटींगवर लक्ष देणार आहे. त्याच्या वाढदिवशी तो अंतिम सिनेमाची शुटींग करताना दिसेल. आधी असं सांगितलं जात होतं की, सलमान त्याच्या फार्म हाऊसवर एखाद्या लहान पार्टीचं आयोजन करण्याची शक्यता आहे. परंतु असंही काही पहायला मिळणार नाही. सध्या तो सिनेमे पूर्ण करण्यावर भर देत आहे.
View this post on Instagram
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभु देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही. याशिवाय तो अंतिम आणि शाहरुख खानच्या पठाण सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तो किक 2 आणि कभी ईद कभी दिवाली सिनेमातही काम करणार आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
Discussion about this post