बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव्ह असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं ती अनेकदा चर्चेतही आली आहे. अभिनेता जावेद जाफरी (Javed Jaffrey) चा मुलगा अॅक्टर मीजान जाफरी (Mizaan Jaffrey) सोबत ती अनेकदा स्पॉट झाली आहे. एकदा तर मीजान तिच्या सोबत असताना कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर टीशर्टनं चेहरा लपवताना दिसला होता. पुन्हा एकदा फोटोमुळं ही जोडी चर्चेत आली आहे.
— TimePass (@TimePassTalks) December 28, 2020
— TimePass (@TimePassTalks) December 28, 2020
नव्यानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या ती छातावर बसल्याचं दिसत आहे. हा फोटो सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. पंरतु मीजानच्या कमेंटनं खास लक्ष वेधून घेतलं.
View this post on Instagram
मीजाननं कमेटं करत लिहिलं की, तुझा चेहरा दाखवू शकतेस का. यासोबत त्यानं हार्ट इमोजीही पोस्ट केली आहे. सध्या फोटोएवढीच त्याच्या कमेंटचीही चर्चा सुरू आहे.
— TimePass (@TimePassTalks) December 28, 2020
मीजानची ही कमेंट पाहून दोघांत काय शिजत आहे असा सवाल अनेकांनी केला आहे. सध्या नव्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
— TimePass (@TimePassTalks) December 28, 2020
मीजानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर संजय लीला भन्साळी यांच्या मलाल या सिनेमातून त्याने करिअरला सुरुवात केली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. त्याला आवाजवरूनही लोकांनी ट्रोल केलं आहे. मीजानचा रोल पाहिल्यानंतर काहींनी असेही म्हटले की, तो संजय दत्तला कॉपी करत आहे.
Discussion about this post