बॉलीवूडनामा ऑनलाइन – ड्रामा क्वीन राखी सावंतला ‘बिग बॉस 14’च्या घरात टक्कर देणारी अर्शी खान सतत चर्चेत असते. अर्शी खान सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. अर्शीने इन्स्टाग्राम १.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. अर्शी खान मात्र केवळ ९० लोकांना फॉलो करते़. अर्शी आपल्या चाहत्यांसाठी रोज नवे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो.
Viral Photos : सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस बघून चाहते झाले क्रेझी
सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सगळ्यांशी पंगा घेण्यासाठी तयार असलेल्या अर्शीसोबत एका चाहत्याने काय केलं याची आपण कल्पना करू शकत नाही. अर्शी खान एअरपोर्टवर मीडियाशी बोलत होती. तो आला आणि अचानक अर्शी खानला किस करून तिथून निघून गेला. तिचा हाच व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. तर काल रात्री अर्शी एअरपोर्टवर दिसली. काळ्या रंगाचा ड्रेस, डोळ्यांवर गॉगल अशा स्टायलिश अंदाजात एअरपोर्टवर दिसलेल्या अर्शी खानला पाहून सगळे फोटोग्राफर्स तिच्याभोवती जमा झालेत. अर्शी खान फोटोग्राफर्सशी बोलत असताना एक चाहता आला. त्याने अर्शीसोबत सेल्फी घेतली आणि सेल्फी घेतल्यानंतर अचानक अर्शीचा हात हातात घेऊन त्यावर किस करून निघून गेला. क्षणभर काय होतेय, हे अर्शीलाही कळले नाही. ती आश्चर्यचकित होऊन त्या चाहत्याकडे नुसती बघत राहिली आणि मग, चलो चलो… हो गया अभी म्हणून फोटोग्राफर्सला निघून गेली.
अर्शी खानचा हा व्हिडीओ काहीच क्षणात व्हायरल झाला. काही तासांत ३ लाखांवर लोकांनी हा व्हिडीओ बघितला. अनेकांना चाहत्याचे हे वागणे खटकले. त्याबद्दलचा संतापही त्यांनी बोलून दाखवला. काहींनी तर चक्क त्या चाहत्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला अर्शीला दिला.
Discussion about this post