बॉलीवूडनामा ऑनलाइन – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसत आहेत. घरात आल्यापासून ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) काही ना काही कराणानं चर्चेत येत आहे. अनेकदा राखी अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) वरील तिचं प्रेम व्यक्त करताना दिसली आहे. राखीला अनिभव आणि घरातील इतरीह लोक खूप वैतागले आहेत. खास करून अभिनवची पत्नी रूबीना दिलैक जास्त वैतागलेली दिसत आहे. आता या आठवड्याच्या वीकेंड वॉरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा आपल्याला आपल्याला पहायला मिळणार आहे. रूबीनानं अभिनववरून राखीला अनेकदा वॉर्निंग दिली आहे. आता मात्र ती संतापलीदेखील आहे आणि ढसा-ढसा रडली देखील आहे.
राखी सावंतनं एका लूप टास्क दरम्यान साऱ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. राखी अभिनवचा पायजमा ओढताना दिसली. परंतु अभिनव स्वत:ला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसला. तरीही राखीच्या हरकतींमध्ये काही सुधारणा दिसली नाही.
View this post on Instagram
जेव्हा राखीच्या हरकतींबद्दल रूबीनाला कळालं तेव्हा रूबीनानं राखीला चेतावणी दिली. ती म्हणाली, अभिनवसोबत राखीनं लिमिट मध्ये वागावं. राखी स्पष्टपणे नकार देत म्हणाली की, ती अभिनवचा पिछा सोडणार नाही. याचा एक प्रोमो व्हिडीओदेखील समोर आला आहे. ज्यात राखी आणि रूबीना यांच्यात घमासान होताना दिसत आहे.
ढसा-ढसा रडू लागली रूबीना
राखी रूबीनाला म्हणते, तो घरी असेल तेव्हा नवरा आहेत तुझा. इथं माझ्यासाठी फक्त एक स्पर्धक आहे. तू मला रोखू शकत नाही. राखीच्या हरकती पाहून रूबीना मात्र ढसा-ढसा रडते.
Discussion about this post