बॉलीवूडनामा ऑनलाइन – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसत आहेत. घरात आल्यापासून ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) काही ना काही कराणानं चर्चेत येत आहे. अनेकदा राखी अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) वरील तिचं प्रेम व्यक्त करताना दिसली आहे. राखीला अनिभव आणि घरातील इतरीह लोक खूप वैतागले आहेत. खास करून रूबीना. आता या आठवड्याच्या वीकेंड वॉरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा आपल्याला आपल्याला पहायला मिळणार आहे. शनिवारी शो चा होस्ट सलमान खान (Salman Khan) अभिनव शुक्ला आणि निक्की तंबोली (Nikki Tamboli) यांचा समाचार घेताना दिसणार आहे. अभिनव सलमानकडे राखीच्या वर्तनाबद्दल तक्रार करण्याचा प्रयत्न करतो, परंतु सलमान खान यात जराही रुची दाखवत नाही.
बिग बॉसचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे ज्यात सुरुवात सलमान खान आणि निक्की तंबोली यांच्या संवादानं सुरुवात होताना दिसते आहे. निक्की तुझ्यात काय बदल झालाय, तुझ्यात, तुमच्यात तू बोललंही जात नाहीये माझ्याकडून असं असूनही ज्या प्रकारे तुम्ही वागत आहात मी तुम्ही असं म्हणत बोलत आहे. तुमच्याशी बोलत आहे. मी तुम्ही असं संबोधून बोलत आहे, एकदा समजावलं तर समजलं नाही. दुसऱ्यांदा समजावलं समजलं नाही. तिसऱ्या वेळी भाड मे जाओ असंही तो म्हणाला.
यानंतर सलमान खान म्हणतो, राखी या घरातील सर्वात मोठी एंटरटेनर आहे. तिचा फायदा सर्वात जास्त कोणाला होत आहे. तेव्हा रूबीना म्हणते, पूर्ण घराला. यावर सलमान म्हणतो, तुम्ही लोक बरोबर आहेात की, बाकीचं घर बरोबर आहे ?
View this post on Instagram
रूबीना म्हणते, इथं कोणी चुकीचं किंवा बरोबर नाहीये. तेव्हा सलमान मोठ्या आवाजात म्हणतो, इथं आहे. फक्त आणि फक्त अभिनवला फायदा होत आहे. यावर होत जोडून अभिनव म्हणाला, ठिक आहे सर मला अजिबात फायदा नको आहे. सर्वांसमोर हात जोडून सांगतो.
View this post on Instagram
नंतर अभिनव म्हणतो, जर हे मनोरंजन असेल तर मला आताच घरी जायचंय. यानंतर अभिनवच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा रूबीना त्याला हग करते.
बिग बॉसच्या या एपिसोडचा हा प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.
Discussion about this post