बॉलीवूडनामा ऑनलाइन – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसत आहेत. घरात आल्यापासून ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) काही ना काही कराणानं चर्चेत येत आहे. राखीनं(Rakhi Sawant) घरात आल्यानंतर तिच्या पतीबद्दलही अनेकदा भाष्य केलं आहे. आता पतीनं पाठवलेलं पत्र वाचून राखी सावंत भावूक झाली आहे.
काय लिहिलं होतं पत्रात ?
राखीच्या पतीनं पत्रात लिहिलं होतं की, प्रिय राखी यंदाचे सेलिब्रेशन तुझ्यामुळं खूप खास बनलं आहे. तूच माझे आयुष्य आहे. बिग बॉसमध्ये तू खूप चांगलं काम करत आहेस. इतरांचं मनोरंजन करता येईल यावर अधिक भर दे. आधीप्रमाणेच यातही खेळी दाखव. गेमवर जास्त फोकस कर. यावेळी तुला बिग बॉसची विजेती बनताना पहायचं आहे. मला तु्झ्यावर खूप गर्व आहे. तू जिंकून येशील याची मला खात्री आहे.
View this post on Instagram
पतीचं पत्र वाचल्यानंतर राखी म्हणते, मला गेम खेळता येत नाही रितेश (पती), मी फक्त मनोरंजन करू शकते. प्रत्येक गोष्टीत मी कुरघोड्या करत बसत नाही. जर कोणी मला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल त्यावरच मी स्वत:ची बाजू मांडते. थँक्यु रितेश… लव यु… गॉड ब्लेस यु. माझ्यासाठी तुझ्या बिजी शेड्युलमधून वेळ काढलास यापुढे माझ्यासाठी असा वेळ काढत रहा. कारण माझ्या आयुष्यात मला कधीच खरं प्रेम मिळालं नाही. मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप खरं प्रेम आहे.
View this post on Instagram
राखीचा पती रितेश एक एनआरआय आहे. तो एक बिजनेसमन असून रहायला युकेला आहे.
View this post on Instagram
Discussion about this post