बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार इमरान हाशमी (Emraan Hashmi) हा सिरीयल किसर म्हणून ओळखला जातो. सुरुवातीच्या अनेक सिनेमात त्यानं अनेक बोल्ड सीन आणि किसिंग सीन दिले आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूडमधील 3 अॅक्ट्रेससोबत कधीही किसिंग सीन देणार नाही असं इमरानं सांगितलं होतं. आज इमरान त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आज आपण त्याच्या आयुष्याील काही न ऐकलेले किस्से जाणून घेणार आहोत.
View this post on Instagram
इमराननं सांगितलं होतं की, तो अभिनेत्री आलिया भट्ट सोबत कधीही किसिंग सीन देणार नाही. याचं कारण होतं महेश भट्ट. इमरान आणि महेश भट्ट यांच्यात चांगली मैत्री आहे. महेश भट यांच्या अनेक सिनेमात त्यानं काम केलं आहे. महेश भट्ट यांच्यामुळंच तो कलाविश्वास पदार्पण करू शकला. त्यामुळं तो महेश भट्ट यांचा कायमच आदर करतो. आलियाला तो बहिण मानतो. तिला बहिण मानत असल्यानं तिच्यासोबत असे सीन करणार नसल्याचं त्यानं सांगितलं.
View this post on Instagram
आणखी एक अॅक्ट्रेस अशी आहे जिच्यासोबत किसिंग सीन देणार नसल्याचं इमरान हाशमीनं सांगितलं होतं. या अॅक्ट्रेसचं नाव आहे कंगना रणौत. कंगना सोशल मीडियावर कायमच वादग्रस्त विधानं करत असते. कलाकारांवरही ती अनेकदा टीका करत असते. तिचं अनेक कलाकारांसोबत जमत नाही. या यादीत इमरानचंही नाव आहे. काही कारणानं त्यांच्यात वाद झाला होता. त्यामुळं तिच्यासोबत किसिंग सीन करणार नाही असं इमराननं सांगितलं होतं.
View this post on Instagram
बॉलिवूड अॅक्ट्रेस जरीन खान हिच्यासोबतही इमरानला किसिंग सीन देणं योग्य वाटत नाही असं त्याचं म्हणणं आहे. जरीन आणि तो चांगले मित्र आहेत. त्यामुळं तिच्यासोबत असे सीन देणं योग्य नाही असं तो म्हणतो.
View this post on Instagram
गेल्या काही दिवसात त्याची सीरियल किसरची प्रतिमा बदलली आहे असं दिसत आहे. याची झलक वन्स अपॉन अ टाईन इन मुंबई आणि द डर्टी पिक्चर या सिनेमात पहायला मिळते. यात इमरानच्या अभिनयाची दुसरी बाजू पहायला मिळाली आहे.
View this post on Instagram
इमरानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं अनेक हिट सिनेमात काम केलं आहे. लवकरच तो चेहरे या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, इमरान, रिया चक्रवर्ती, क्रिती खरबंदा, सिद्धांत कपूर आणि अन्नू कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. अलीकडेच त्यानं वेब विश्वात पदार्पण केलं आहे. बार्ड ऑफ ब्लड ही त्याची पहिली वेब सीरिज होती. नुकताच त्याचा मुंबई सागा हा सिनेमा रिलीज झाला आहे.
Discussion about this post