बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आज त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याची प्रोफेशनल लाईफ जेवढी धमाकेदार आहे तेवढीच मजेदार त्याची लव लाईफ आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण काही न ऐकलेले किस्से जाणून घेणार आहोत.
श्रेयसचा जन्म 27 जानेवारी 1976 रोजी मुंबईत झाला होता. मराठी टीव्ही मालिकेतून त्यानं त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. 2005 साली आलेल्या इकबाल या हिंदी सिनेमात लिड रोल साकारत त्यानं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. या सिनेमात त्याचं खूप कौतुक झालं होतं. यानंतर त्यानं अनेक सिनेमात काम केलं. त्याची कॉमेडी सर्वांनाच आवडली.
श्रेयसची लव्ह स्टोरी सुद्धा खूप फिल्मी आहे. 2000 साली श्रेयसला एका कॉलेजच्या फेस्टसाठी बोलवलं होतं. कॉलेजच्या त्याच फेस्टमध्ये दीप्ती सेक्रेटरी होती. पहिल्याच नजरेत तो दीप्तीच्या प्रेमात पडला. चारच दिवसात त्यानं दीप्तीला प्रपोज केलं. दोघांनी दीर्घकाळ एकमेककांना डेट केलं. 2004 साली दोघांनी लग्न केलं. 14 वर्षांनंतर 4 मे 2018 रोजी सरोगेसीनं ते आईबाबा झाले. त्यांच्या मुलीचं नाव आद्या आहे.
श्रेयसच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं आजवर अनेक शानदार सिनेमात काम केलं आहे. रोहित शेट्टीच्या गोलमाल या सिनेमांच्या सीरिज व्यतिरीक्त त्यानं साजिदच्या सिनेमाची सीरिज हाऊसफुलमध्येही काम केलं आहे. अॅक्टींगच्या सुरुवातीच्या काळात डोर सिनेमातील त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. अलीकडेच त्यानं नवीन ओटीटी व्हेंचर नाईन रसा लाँच केलं आहे.
Discussion about this post