बॉलीवूडनामा ऑनलाइन – चिंकी-मिंकी ( (Chinki-Minki)बोलताना सेम स्टेटमेंट बोलतात आणि अॅक्शनही त्यांची सेमच असते. त्यामुळं अनेकांना प्रश्न पडतो एकाची वेळी सेम स्टेटमेंट कंवा सेम अॅक्शन या मुली कशा करत आहेत. त्यांच्यातला फरक करणंही कुणाला सहसा समजत नाही. सध्या चिंकी-मिंकी(Chinki-Minky) सोशलवर चर्चेत आल्या आहेत. सोशलवर त्यांचा हा डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
चिंकी आणि मिंकीचा एक डान्स व्हिडीओ सध्या समोर आला आहे जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. नोहा फतेही (Nora Fatehi) आणि गुरू रंधवा (Guru Randhawa) यांच्या अलीकडेच रिलीज झालेल्या नाच मेरी रानी (Naach Meri Rani) गाण्यावर या दोघी जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्सही चाहत्यांना खूप आवडल्या आहेत. युट्युबवर (YouTube) हा व्हिडीओ टॉप ट्रेंड वर आहे.
Discussion about this post