बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा (Desi Girl) हिनं तिचा आगामी सिनेमा वी कॅन बी हिरोज (We Can Be Heroes) चा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स (Netflix) वर रिलीज होणार आहे. प्रियंका एका रोचक भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर करताना प्रियंकानं(Desi Girl) हेही सांगितलं आहे की, हा मुलांचा सिनेमा आहे.
रॉबर्ट रॉड्रिग्ज (Robert Rodriguez) डायरेक्टेड हा सिनेमा नवीन वर्षी रिलीज होणार आहे. मुलांचा सुपरहिरोचा हा सिनेमा आहे. प्रियंकानं तिच्या भूमिकेसोबतच इतर कलाकार याया गोसलिन, पेड्रो पास्कल, क्रिस्टियन स्लेटर, बॉयड हॉलब्रुक यांना इंट्रोड्युस केलं आहे. याया बालकलाकार आहे.
View this post on Instagram
पोस्ट शेअर करताना प्रियंकानं खास कॅप्शनही दिलं आहे. तिनं लिहिलं की, अखेर हे आलं आहे. वी कॅन बी हिरोजचा फर्स्ट लुक सादर करत आहे. सोबत तिनं डायरेक्शन आणि रिलीजबद्दलही माहिती दिली आहे.
डायरेक्टर रॉबर्ट रॉड्रिग्ज स्पाय किड्स सीरिज आणि द अॅडव्हेंचर ऑफ शार्कबॉय अँड लावागर्ल साठी ओळखला जातो.
प्रियंका सध्या हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये बिजी आहे. अॅक्टींग सोबत ती सिनेमा प्रोड्युसरही करत आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या द व्हाईट टायगर या सिनेमाचा ट्रेलर तिनं काही दिवसांपूर्वीच रिलीज केला आहे.
View this post on Instagram
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.
Discussion about this post