बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड अॅक्ट्रेस भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) चा दुर्गामती : द मिथ (Durgamati : The Myth) हा सिनेमा 11 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) वर रिलीज झाला आहे.
जेव्हा सिनेमाचा(Durgamati ) ट्रेलर रिलीज झाला तेव्हा असं वाटलं होतं की, यात भूमीचा(Durgamati ) दमदार अभिनय आणि डायलॉग असेल. यात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स असतील. ट्रेलरनं खूप उत्सुकता वाढवली होती. फक्त हे पाहायचं होतं की, सिनेमा चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरतो की नाही.
स्टोरी
झाडावर लटकणारा मृतदेह, पायऱ्यांवर पडलेली महिला आणि जीव वाचवण्यासाठी पळणारी मुलं. हा दुर्गामतीचा सुरुवातीचा सेटअप आहे जो पाहिल्यानंतर धडधड वाढते. बॅकग्राऊंड स्कोरही चांगला आहे. हे सर्व एका गावातील एका जुन्या हवेलीत होत असतात. राणी दुर्गामतीची हवेली. यात खुन झालेल्या दुर्गामातीचा आत्मा भटकत असतो असं सांगितलं जात असतं. गावकरी याच्या आसपास भटकतही नाहीत. हा आहे पहिला प्लॉट
यात अरशद वारसीनं जल संसाधनमंत्री ईश्वर प्रसादची भूमिका साकारली आहे. त्यांनी आपल्याच सरकार विरोधात त्यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी एक इमानदार आणि मसीहा अशी इमेज बनवली आहे. एक अशी केस सुरू असते ज्यात प्राचीन मंदिरातून मुर्ती गायब होत आहेत. यामुळं गावकरी नाराज आहेत आणि सरकारची इमेज खराब होत आहे. हा दुसरा प्लॉट.
तिसऱ्या प्लॉटमध्ये आपली चंचल कुमार (भूमी पेडणेकर) सोबत ओळख होते. ती एक IAS अधिकारी असते. चंचल खूप मोठ्या अडचणीत सापडते. तिनं तिचा प्रेमी आणि लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शक्ती (करण कपाडिया) ला गोळी मारली आहे. त्यामुळं तिला जेलची हवा खावी लागते.
आता येथो चौथा प्लॉट ज्यात आपण अशा सीबीआय ऑफिसरला (माही गिल) भेटतो जिला ईश्वर प्रसादला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात फसवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अशात चंचलची चौकशी करण्यासाठी तिला दुर्गामती हवेलीत नेलं जातं. कारण हे सगळं गुपचूप करायचं होतं. ती अरशदच्या जवळची राहिलेली असते. म्हणून तिची चौकशी करायची असते.
ही आहे सिनेमाची स्टोरी. पुढं काय काय होतं याची उत्सुकता असेल आणि ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टर अशोकचा हा सिनेमा पहावा लागेल.
चक्री सारखी फिरणारी स्टोरी
हा सिनेमा 155 मिनिटांचा आहे. यातही 120 मिनिटे तुम्ही चक्री सारखं फिरता. आम्ही तुम्हाला तुकड्यांमध्ये स्टोरी समजावून सांगितली आहे. सिनेमात अनेक स्टोरी पाहायला मिळतात परंतु त्यांच्यातील कनेक्शन शोधताना तुम्ही कन्फ्युज व्हाल. दुर्गामतीच्या मेकर्सला वाटत आहे की, आपण 2 तास त्यांना सहकार्य करावं कारण त्यानंतर ते स्टोरीतील सिक्रेट ओपन करण्याचं मन बनवत आहेत. पंरतु प्रेक्षकांकडून अशी अपेक्षा करणं निरुपयोगी आहे. एवढी हिंमत आणि संयम कोणाकडेही नाही.
भूमी पेडणेकरची सर्वात मोठी चूक आणि इतर कलाकारांची अॅक्टींग
सिनेमात इतरही स्टार्स आहेत. पंरतु भूमीमुळं सिनेमा आणखी मोठा बनला आहे. यावेळी असं म्हणावं लागेल की, भूमीकडून एक चूक झालीय. पूर्ण सिनेमात भूमी फक्त आणि फक्त ओरडत आहे. तिच्याकडून हास्यास्पद डायलॉगची हवाबाजी ऐकयला मिळते. नेत्याच्या रोलमध्ये अरशदनंही ठिक ठाक काम केलेलं दिसत आहे. माही गिलनंही अॅव्हरेज काम केलं आहे. जी सीबीआय अधिकारी म्हणून आणखी जरा कडक दिसली असती तर मजा आली असती. सहकलाकार म्हणून जिशू सेनगुप्ता आणि तान्या अबरोल हेही फुसके वाटले.
सिनेमा पहावा की नाही ?
दुर्गामती हा सिनेमा तेलगू-तमिळ सिनेमा भागमती (Bhaagamathie) चा रिमेक आहे. अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) नं यात प्रमुख भूमिका साकरली होती. अनुष्का शेट्टीमुळं लोकांनी हा सिनेमा पाहिला तरी. पंरतु दुर्गामतीबद्दल असं काही होताना दिसलं नाही. क्लायमॅक्स तर एवढा भयंकर आहे की, तुम्ही तुमचं डोकंच पकडताल. त्यामुळं हा सिनेमा तु्म्ही न पाहताही राहू शकता. तरी तु्म्ही पूर्ण माहिती घेतल्यानंतर ठरवू शकता की, सिनेमा पाहिला पाहिजे की, नाही.
Discussion about this post