बॉलीवूडनामा ऑनलाइन – हुमा कुरेशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘आर्मी ऑफ द डेड’ या सिनेमातून हॉलिवू़डमध्ये एण्ट्री करतेय. जॅक स्नायडर दिग्दर्शित ‘आर्मी ऑफ द डेड’ चा धमाकेदार ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. या सिनेमात झोंबी वॉर पाहायला मिळणार आहे.
हे ६ दिग्दर्शक आहेत तब्बल इतक्या कोटींचे मालक; वाचून व्हाल हैराण
या सिनेमात हुमा गीता नावाची भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हुमाची एक झलक पाहायला मिळतेय. या सिनेमात झोंबींपासून शहराला वाचवण्यासाठी पुकारलेलं युद्ध पाहायला मिळणार आहे. यासाठी काही तरुणांची फौज झोंबीं विरुद्ध लढण्यासाठी सज्ज असल्याचं दिसतंय. हुमा या फौजेतील एक तरुणी आहे. त्यामुळे या सिनेमात तिचा धडाकेबाज अंदाज पाहायला मिळू शकतो.
हुमाच्या या पोस्टवर अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे. हुमा कुरेशी लवकरच अक्षय कुमारसोबत बेलबॉटम या सिनेमातही झळकणार आहे.
Super proud to be a small part of this genius man’s vision @ZackSnyder always a fan and friend forever ❤️ https://t.co/Pan4QyJTBM
— Huma S Qureshi (@humasqureshi) April 13, 2021
Discussion about this post