बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिनं तिच्या आगामी सिनेमाची शुटींग सुरू केली आहे. रश्मी रॅकेट (Rashmi Rocket) असं या सिनेमाचं नाव आहे. तापसीनं या सिनेमाचा फर्स्ट लुक(First look ) शेअर केला आहे. सिनेमात तापसी अॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं डायरेक्शन आकर्ष खुराना करणार आहे.
तापसीनं तिच्या इंस्टावरून फोटो शेअर केला आहे. यात रश्मी रॅकेट सिनेमातील तिचा फर्स्ट लुक(First look ) दिसत आहे. तापसीची खासियत अशी आहे की, आपल्या सिनेमांसाठी ती कायमच चॅलेंज घेत असते. आता अॅथलिटच्या भूमिकेसाठीही तिनं खूप कष्ट घेतले आहेत. सिनेमाची निर्मिती रोनी स्क्रूवालानं केली आहे. गेल्या आठवड्यात सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे.
रश्मी रॅकेटचा फर्स्ट लुक
फर्स्ट लुकमध्ये तापसी रनिंग ट्रॅकवर पाठमोरी उभी आहे असं दिसत आहे. सिनेमात तिनं एका गुजराती मुलीची भूमिका साकारली आहे. जिनं आपल्या जिद्दीच्या जोरावर इंटरनॅशनल लेव्हलवर तिचं नाव पोहोचवलं आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती थप्पड सिनेमात दिसली होती. यानंतर आता ती शाबाश मिठू मध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा क्रिकेटर मिताली राजचं बायोपिक आहे. याशिवाय हसीन दिलरूबा हाही प्रोजेक्ट तिच्याकडे आहे. या सिनेमात तिच्यासोबत विक्रांत मेसी, हर्षवर्धन राणे, हंसिका मोटवानी, ताहिर शब्बीर असे कलाकार दिसणार आहेत. लूप लपेटा हा सिनेमाही तिच्याकडे आहे.
Discussion about this post