बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिचं मुंबईबद्दलचं अचानक समोर आलेलं प्रेम पाहून आता शिवसेना नेत्या अॅक्ट्रेस उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी टोला लगावला आहे. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ असं खोचक ट्विट त्यांनी(Urmila Matondkar) केलं आहे.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत करणारी कंगना कालप रवा मुंबई दाखल झाली. मुंबईत दाखल होताच कंगनानं सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. इतकंच नाही तर मंदिराच्या बाहेर येताच अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1343816766422577154?s=20
कंगना म्हणाली, मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त बाप्पाची परवानगी तेवढी हवी. ती मिळाली आहे. माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्यामुळं शत्रुंचा सामना करावा लागला. मी आज मुंबा देवी आणि श्री सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आता मला सुरक्षित वाटत आहे.
https://twitter.com/UrmilaMatondkar/status/1343857707116163072?s=20
कंगनाच्या याच वक्तव्यावरून उर्मिला मातोंडकरांनी जोरदारी टीका केली आहे. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ असं खोचक ट्विट त्यांनी शेअर केलं आहे. उर्मिला यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
Discussion about this post