बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळं अनेकदा चर्चेत आली आहे आणि ट्रोलही झाली आहे. सुशांतवरून अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. ती सुशांतला विसरली का असे सवालही अनेकांनी केले होते. परंतु आता तिनं तिच्या ट्रोलर्सला जोरदार उत्तर दिलं आहे.
अंकितानं तिच्या इंस्टावरून एक लाईव्ह व्हिडीओ शेअर केला आहे. 1 जानेवारी 2021 रोजी तिनं मेडिटेशन करून 1 वर्ष पूर्ण होत असल्याचं तिनं सांगितलं आहे. यावेळी बोलताना तिनं ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे. लोकं नावं ठेवायला मागे नाहीत. त्यामुळं नाराज होण्यापेक्षा हताश न होता काम करत रहावं.
View this post on Instagram
पुढं बोलताना आणि टीकाकारांना उत्तर देताना ती म्हणाली, लोकांचं बोलायला काय जातं. ते टीका करतच असतात. सुशांत प्रकरणातही मला प्रचंड मानसिक त्रास झाला. परंतु मी कुणाकडे लक्ष देत नाही. मी आता ठिक आहे. लोक काय म्हणतात याला जास्त गांभीर्यानं घेत नाही. त्यांना माझं वागणं बोलणं पटत नसेल तर त्यांनी मला अनफॉलो केलं तरी चालेल. उगागच माझ्यावर कमेंट करून वेळ वाया घालवू नये.
अंकिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पवित्र रिश्ता या मालिकेव्यतिरीक्त तिनं सिनेमातही काम केलं आहे. कंगना रणौतच्या मणिकर्णिका या सिनेमात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमातही तिनं काम केलं आहे.
Discussion about this post