बॉलीवूडनामा ऑनलाइन – अभिनेत्री सोनिया मान (Sonia Mann) हिला दीप सिद्धूवर टीका केल्यानंतर धमकावल्याचं समोर आलं आहे. प्रजाकसत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान दिल्लीत मोठा हिंसाचार झाला. यात दीप सिद्धूचं नाव समोर येताना दिसलं.
दीपला यासाठी जबाबदार धरल्यानंतर त्यानं त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. त्याच्या विरोधात बोलण्यावरून अॅक्ट्रेस सोनियाला धमकी देण्यात आली आहे.
‘दीप सिद्धू विरोधात बोलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील’
सोनिया म्हणाली की, मला एका खासगी नंबरवरून फोन आला होता. समोर माणसानं मला अशी धमकी दिली की, दीप सिद्धू विरोधात बोलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. सोनियानं या प्रकरणी अद्याप पोलिसात धाव घेतलेली नाही.
काय म्हणाली सोनिया ?
सोनिया म्हणाली की, प्रजासत्ताक दिनी जे घडलं, त्यामुळं शेतकऱ्यांची बदनामी झाली. भगत सिंग, उधम सिंग यांच्या सारख्या थोर व्यक्तींच्या बलिदानामुळं आपल्याला तिरंगा मिळाला. त्याचा आदर केला पाहिजे. तिरंग्याची प्रतिष्ठा कमी होईल असं कोणतंही कृत्य आम्ही केलेलं नाही. परंतु दीप सिद्धू सारख्या काही लोकांमुळं आम्ही राष्ट्राविरोधी ठरवलं जात आहे.
सोनियाचे वडिल बलदेव मान यांची 26 सप्टेंबर 1990 रोजी अमृतसरमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सोनिया फक्त 16 दिवसांची होती. तेच वडिल डाव्या विचारांचे, लेखक होते.
Discussion about this post