बहुजननामा ऑनलाईन – इंडियन आयडॉल या कार्यक्रमाचे हे पर्व कार्यक्रमातील काही स्पर्धकांमुळे चांगलेच वादात सापडले आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे आवाज तर प्रेक्षकांना आवडत आहेत. पण या कार्यक्रमातील काही स्पर्धक त्यांच्या परिस्थितीच्या बाबतीत खोटं बोलत असल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
View this post on Instagram
इंडियन आयडॉलचे हे १२वे पर्व आहे. या पर्वात ऑडिशनच्या वेळी सवाईने आपल्या गरिबीची कहाणी ऐकवली होती. त्यामध्ये त्याने कळसूत्री बाहुल्यांचा खेळ दाखवून मिळणाऱ्या पैशातून घर चालवत असल्याचा आणि अतिशय हलाखीचे आयुष्य जगत असल्याचे सांगितले होते. त्याची हि गोष्ट ऐकून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले होते. याच सवाई भट्टचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामध्ये तो स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. यावरून त्याच्या गरीब असण्याच्या दाव्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता असेच सायली कांबळेच्या बाबतीतसुद्धा घडले आहे.
View this post on Instagram
सायली कांबळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती सुरेश वाडकर यांच्यासोबत गाताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर सायलीच्या गरिबीबद्दल चर्चा रंगू लागली आहे. सायलीने इंडियन आयडॉल या कार्यक्रमात सांगितले होते की, ती आणि तिची फॅमिली चाळीतल्या एका घरात राहतात. तिचे वडील रुग्णवाहिका चालक आहेत. तसेच त्यांच्या घरात टिव्हीसुद्धा नाही आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सायलीने इथपर्यंत आली आहे त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत होते. पण तिचा सुरेश वाडकर यांच्यासारख्या दिग्गजांसोबत स्टेज परफॉर्मन्स देताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने ती तिच्या परिस्थितीबाबत खोटे बोलत होती अशी चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
Discussion about this post