बॉलीवूडनामा ऑनलाइन – बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरने मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई ताम्हणकर तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते.
हिना खानच्या ‘या’ देसी लुकने नेटकरी पडले तिच्या प्रेमात; नथीचा नखरा होतोय व्हायरला
सई ताम्हणकर हिने नुकतीच इंस्टाग्रामवर लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत. सई ताम्हणकरच्या या फोटोतील सोज्वळ अदा चाहत्यांना खूप भावत आहेत.
सई ताम्हणकरच्या लेहंग्यातील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. तसेच सई ताम्हणकर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी’ या हिंदी चित्रपटात ती झळकणार आहे. सई ताम्हणकर लवकरच ‘कलरफुल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सई मीराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही एक लव्हस्टोरी आहे.
Discussion about this post