बॉलीवूडनामा ऑनलाइन – हॉलिवूड स्टार टॉम क्रूज (Tom Cruise) सध्या मिशन इम्पॉसिबल 7 (Mission Impossible 7) या आगामी सिनेमाच्या (Mission Impossible 7)शुटींग मध्ये बिजी आहे. परंतु या दरम्यान तो कोरोना सुरक्षिततेचे नियम तोडल्यानं क्रूवर संतापलेला दिसला.
प्रॉडक्शनमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉम क्रूजला तेव्हा राग आला जेव्हा त्याला दिसलं की, क्रूमधील 2 मेंबर्स कोरोनाच्या गाईडलाईन्स मोडताना दिसले.
https://twitter.com/RexChapman/status/1339020608294838273?s=20
एका इंग्रजी रिपोर्टनुसार, 2 क्रू मेंबर कॉम्प्युटर स्क्रीनसमोर एकमेकांच्या फार जवळ उभे होते. हे पाहिल्यानंतर टॉम क्रूज खूपच भडकला. टॉम त्यांना म्हणाला की, जर तुम्ही पुन्हा असे दिसून आलात तर कामावरून काढून टाकेन.
View this post on Instagram
एका वेबसाईटकडे टॉमच्या संतापण्याचा ऑडिओ देखील आहे. यात तो म्हणत आहे की, आपल्यामुळं हे लोक हॉलिवूडमध्ये सिनेमे बनवण्यासाठी परतले आहेत. ते आपल्यावर विश्वास ठेवतात आणि आपण काय करतोय. तो म्हणाला की, आपम हजारो जॉब क्रिएट करत आहोत. मला हे असं पुन्हा पहायचं नाहीये. टॉम क्रूज कोरोनाच्या गाईडलाईन्स बाबत खूपच स्ट्रीक्ट आहे.
अलीकडेच समोर आलेल्या एका व्हिडीओत टॉम इटलीत बाईक स्टंट करताना दिसला होता. खास बात अशी की, ही बाईक मेड इन इंडिाय होती. BMW G310 GS अशी ही बाईक होती. अनेकद देशांमध्ये ही बाईक एक्सपोर्ट झाली आहे.
Discussion about this post