बॉलीवूडनामा ऑनलाइन –बॉलिवूड अॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिस आणि मनोज वाजपेयी यांच्या नेटफ्लिक्सवरील मिसेस सिरीयल किलरचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. आता हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे .यामध्ये जॅकलीन फर्नांडिस, मनोज वाजपेयी, मोहित रैना, झेन मेरी खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा कसा आहे हे आपण जाणून घेऊयात.
सिनेमात मनोज वाजपेयीनं जीव ओतण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची भूमिका खूप बेढंग आहे. मनोनजनं डॉ मुखर्जीचा रोल साकारला आहे. जो स्त्री रोग तज्ञ आहे. त्याच्यावर अविवाहित गर्भवती मुलींची हत्या करण्याचा आरोप आहे. त्याची पत्नी(जॅकलीन फर्नांडिस) पतीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करते. मोहिनत रैनानं इम्रान शाहिद नावाच्या पोलीसाची भूमिका साकारली आहे. ज्याची कपल सोबत पुरानी दुश्मनी असते.
मनोज जे हॉस्पिटल चालवत असतो त्यात पत्नीचा मोठा हस्तक्षेप असतो. तिला सोना मॅटर्निटी होम म्हटलं जातं. या कोणता स्टफ किंवा अटेंडंट दिसत नाही. सर्वकाही एका सेटअप सारखं वाटतं. जसं काही अर्धी अधुरी रिहर्सल केली जात आहे.
शेवटच्या क्षणी किलरपासून सुटण्याचा प्रयत्न करणारा बंदी डगमगता वाटतो. जसं काही तो किलरची वाट पहात आहे. यात जॅकलीनचा एक डायलॉग आहे की, ये जिंदगी और मौत का सवाल है. हा सर्वात जास्त वापरला जाणारा डायॉलग आहे. हा फिल्मी डायलॉग चांगला सीन डिजर्व करत होता.”
मोहित रैनाबद्दल बोलायचं झालं तर त्यानंही ठिकठाक काम केलं आहे. आमिर खानची पुतणी झेन मेरी हिनं या सिनेमातून डेब्यू केला आहे. काही फायटींग सीनमध्ये तुम्ही तिला पाहू शकता. दर्शन जरीवालानं लॉयर फ्रेंडची भूमिका साकारली आहे. हेही पात्र काहीसं अधुरच वाटतं. असं सगळं असूनही सिनेमा इंट्रेस्टिंग पद्धतीनं संपू शकला असता.
Discussion about this post