बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अनिल कपूरचा लहान भाऊ अॅक्टर संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि महीप कपूर (Maheep Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर सुपरअॅक्टीव्ह असणारी शनाया तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळं कायमच अटेंशन घेताना दिसत असते. शनाया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
शनाया कपूरनं तिचं इंस्टाग्राम अकाऊंट पब्लिक केलं आहे. शनायाचं अकाऊंट पब्लिक होण्याचा उशीर होता की, लगेच तिचे काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो अटेंशन घेताना दिसले.
View this post on Instagram
तसं तर शनाया आधीपासूनच सोशलवर अॅक्टीव्ह होती. परंतु तिचं अकाऊंट पब्लिक नसल्यानं तिचे फोटो पाहण्याची संधी काही मिळत नव्हती. शनायानं आता चाहत्यांना ही संधी दिली आहे.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर शनायाचे अनेक अनसीन फोटो ट्रेंड करताना दिसत आहेत. तिचा लुक, बोल्डनेस, हॉटनेस, आणि फॅशन सेंस अशा साऱ्याचंच खूप कौतुक होताना दिसत आहे.
View this post on Instagram
अनेक बॉलिवूड सेलेब्सही शनायाचं पब्लिक इंस्टा अकाऊंट पाहून तिचं स्वागत करताना दिसत आहेत. अर्जुन कपूर पासून तर अनिल कपूर पर्यंत सर्वांनीच तिचं स्वागत केलं आहे.
View this post on Instagram
शनायाची बॉलिवूड स्टारकिड्स सोबत बाँडिंगही चांगली आहे. या यादीत सुहाना खान, अनन्या पांडे, नव्या नंदा अशा सेलेब्सचा समावेश आहे. या मंडळींसोबत ती अनेकदा फिरताना किंवा पार्टी करताना दिसत असते.
View this post on Instagram
शनायाच्या बॉलिवूड डेब्यूबद्दलही अनेक अंदाज लावले जात आहेत. दीर्घकाळापासून असं सांगितलं जात आहे की, शनाया बॉलिवूड डेब्यू करणार आहे. परंतु अद्याप याची औपचारिक घोषणा झालेली नाही. परंतु आता सोशल मीडिया अकाऊंट पब्लिक केल्यानंतर असं वाटत आहे की, लवकरच ती तिच्या ग्रँड डेब्यूची घोषणा करू शकते.
View this post on Instagram
Discussion about this post