बॉलीवूडनामा ऑनलाइन – विंक गर्ल’ आणि साऊथ अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash ) हिचा एक भुवई उडवातानाचा व्हिडीओ समोर आला आणि ती रातोरात स्टार झाली. पहिला मल्याळम सिनेमा ओरू अडार लव (Oru Adaar Love) सिनेमातील गाणं मानिक्य मलाराया पूवी मध्ये तिनं उडवलेल्या भुवईच्या काही सेकंदाच्या व्हिडीओनंच तिला मोठी स्टार बनवलं होतं. प्रिया(Priya Prakash ) आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. पुन्हा एकदा तिनं आपल्या लुक आणि आवाजानं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या प्रियाचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.
View this post on Instagram
प्रियानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात प्रियाचा खूपच क्युट लुक दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर प्रियानं यात साडी घातली आहे. खास बात अशी प्रिया गाणं गाताना दिसत आहे. बॉलिवूड स्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या ऐ दिल है मुश्किल (Ae Dil Hai Mushkil) सिनेमातील चन्ना मेरेया हे गाणं गुणगुणताना ती दिसत आहे.
View this post on Instagram
प्रियाच्या आजूबाजूलाही खूप लोकं दिसत आहेत. ती गाणं गाताना इतर लोक तिला चिअर देखील करत आहेत. सध्या तिचा हा गाणं गातानाचा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत आहे. अनेकांना तिचं गाणं खूप आवडलं आहे.
View this post on Instagram
प्रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा ओरू अडार लव हा एक रोमँटीक ड्रामा होता. हा सिनेमा लुलु यांनी डायेरक्ट केला होता. यात सियाद शाजान, रोशन अब्दुल रहूफ आणि नूरिन शेरिफ यांनी काम केलं होतं. हा सिनेमा कन्नड आणि तेलगुमध्येही डब केला होता. याशिवाय प्रिया लवकरच श्रीदेवी बंगलो या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. याशिवाय ती लव हॅकर्स या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
Discussion about this post