बॉलीवूडनामा ऑनलाइन – मनोरंजन क्षेत्रातील अनेक स्टार्स सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. आजकाल एवढे सेलिब्रिटी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेले आहेत ते आता दुसरं मुंबई बनताना दिसत आहे. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा देखील सध्या सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. रणबीर सध्या दुबईत आपल्या व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. सध्या त्याचे काही फोटो सोशलवर लीक झाले आहेत. त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट नव्हे तर दुसरीच कोणती तरी मुलगी दिसत आहे.
रणबीरचे(Ranbir Kapoor) काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. रणबीर दुबईत व्हॅकेशन साठी गेलाय की, एखाद्या इव्हेंटसाठी गेला आहे हे अद्याप तर कंफर्म झालेलं नाही. परंतु सध्या अनेक स्टार्स व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. त्याच्या या व्हॅकेशनचे 2 फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत.
View this post on Instagram
समोर आलेल्या फोटोत रणबीर एका मुलीसोबत पोज देताना दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यानं ब्राऊन कलरचा टी शर्ट आणि बेज कलरच्या पँटमध्ये दिसत आहे. फोटोत दिसणारी मुलगी रणबीरची एक फॅन आहे. सध्या रणबीरचे फोटो सोशलवर व्हायरल होत आहे. फोटोत दिसणाऱ्या मुलीबद्दल अनेकांनी कमेंट करत सवालही केले होते. कारण त्यांना रणबीर सोबत आलिया भट (Alia Bhatt) असणं अपेक्षित होतं.
View this post on Instagram
रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात काम करताना दिसणार आहे. खास बात अशी की सिनेमात तो गर्लफ्रेंड आलिया भट सोबत काम करणारआहे. याशिवाय रणबीर शमशेरा या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.
Discussion about this post