बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार रवणीर सिंग (Ranveer Singh) आणि साऊथ सिनेमातील फेमस अॅक्टर महेश बाबू (Mahesh Babu) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत दोघं(Ranveer Singh) गप्पा मारताना दिसत आहे. सध्या हा फोटो सोशलवर ट्रेंड करताना दिसत आहे.
अनेकांना प्रश्न पडला असेल की, दोघं आता आगामी सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत का. एका सिनेमासाठी नाही तर ते एका जाहिरातीसाठी एकत्र आले आहेत. दोघं थम्स अप या कोल्ड्रिंकच्या जाहिरातीसाठी एकत्र आले आहेत. याच जाहिरातीच्या शुटींगदरम्यानचा हा फोटो आहे. दोघांचा लुकही खूप रफटफ दिसत आहे.
View this post on Instagram
हा फोटो रणवीरनंच त्याच्या इंस्टावरून शेअर केला होता. इतकंच नाही त्यानं जाहिरातीचा टीजर आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतरच हा फोटो ट्रेंड करताना दिसला.
View this post on Instagram
रणवीरनं शेअर केलेला फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी या जोडीचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो 83 या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाची कहाणी या सिनेमात दाखवली जाणार आहे. सिनेमात रणवीरनं लिजेंडरी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार होता परंतु लॉकडाऊनमुळं सिनेमाची रिलीज टाळण्यात आली. याशिवाय तो रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमातही काम करताना दिसणार आहे. त्याच्याकडे जयेशभाई जोरदार आणि सर्कस हे सिनेमेही आहेत.
Discussion about this post