बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) चा सिनेमा राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) ची त्याचे चाहते आतुरतेनं वाट पहात आहेत. अशी माहिती आहे की, सलमानचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 2021 च्या ईद निमित्त हा सिनेमा रिलीज करण्यासाठी मेकर्सची प्लॅनिंग सुरू आहे. असाही अंदाज लावला जात होता की हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. यामुळं चाहते नाराज होते की, त्यांना थिएटरमध्ये धमाल करता येणार नाही. सिनेमा कधी रिलीज होईल हे काही सांगता येत नाही, परंतु रिलीजआधीच सिनेमानं बक्कळ कमाई केली आहे.
View this post on Instagram
एका इंग्रजी वृत्तानुसार, राधे सिनेमाचे सॅटेलाईट, थिएटर रिलीज, डिजिटल रिलीज आणि म्युझिक राईट्स हे झी स्टुडिओला विकण्यात आले आहेत. तब्बल 230 कोटींचा हा व्यवहार आहे. जर ही बातमी कंफर्म झाली तर कोरोना काळातील ही बॉलिवूडची सर्वात मोठी डील आहे.
View this post on Instagram
या सिनेमात लिड रोलमध्ये सलमान खान आहे हे साऱ्यांनाच माहित आहे. परंतु त्याच्या विरोधात एका तगड्या व्हिलनला उतरवण्याचीही तयारी सुरू आहे. अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याला सलमान खानच्या अपोझिट कास्ट करण्यात आलं आहे. याशिवाय अभिनेता जॅकी श्रॉफ याचीही यात महत्त्वाची भूमिका आहे.
View this post on Instagram
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभु देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही. याशिवाय तो अंतिम आणि शाहरुख खानच्या पठाण सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तो किक 2 आणि कभी ईद कभी दिवाली सिनेमातही काम करणार आहे.
View this post on Instagram
Discussion about this post