बॉलीवूडनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विनर सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि बिग बॉस 13 ची एक्स स्पर्धक शहनाज गिल (Shehnaaz Gill) या जोडीचं एक नवं गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं आहे. या गाण्यात या फेमस जोडीची केमिस्ट्री दिसत आहे. हे गाणं रिलीज होताच टॉप ट्रेंडमध्ये दिसलं. आज सिद्धार्थ(Shahnaz Gill ) त्याचा 40 वाढदिवस साजरा करत आहे. शहनाज गिलनं मात्र त्याचा वाढदिवस आणखी खास बनवला. तिनं मध्यरात्री त्याला बर्थडे विश केलं आणि केकही कापला.
शहनाजनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती सिद्धार्थला बर्थडे विश करताना दिसत आहे. सिद्धार्थचे केक कापतानाचे फोटो आणि व्हिडीओ तिनं तिच्या इंस्टा स्टोरीला शेअर केले आहेत. सिद्धार्थचा वाढदिवस शहनाजनं आणखी स्पेशल बनवला आहे.
View this post on Instagram
शहनाज आणि सिद्धार्थ यांच्या या फोटो आणि व्हिडीओंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेकजण यावर कमेंट करत सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
शहनाज गिल ने आधी रात को सिद्धार्थ शुक्ला से कहा HAPPY BIRTHDAY, शेयर किया VIDEO pic.twitter.com/WhlvoAIKGo
— TimePass (@TimePassTalks) December 12, 2020
अलीकडे जे गाणं रिलीज झालं त्या टोनी कक्कर (Tony Kakkar) आणि नेहा कक्कर (Neha Kakkar) च्या गाण्यात शहनाज आणि सिद्धार्थ यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. शोना शोना (Shona Shona) असं या गाण्याचं नाव आहे. बिग बॉसनंतर आता शहनाजनं तिचं वजन कमी केलं आहे.
Discussion about this post