बॉलीवूडनामा ऑनलाइन – हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शॅरन स्टोन ‘बेसिक इन्स्टिंक्ट’ चित्रपटातून बोल्ड सीन्समुळे चर्चेत आली होती. पुन्हा एकदा ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. आता तिने तिचा एक अनुभव शेअर केला आहे. जो खूप धक्कादायक आहे. अभिनेत्रीने गाठ (ट्युमर) काढण्यासाठी ब्रेस्ट सर्जरी केली होती. मात्र जेव्हा सर्जरी पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीला समजले की तिच्या छातीचा आकार वाढला आहे.
मोडलेल्या लग्नाबद्दल बोलताना श्र्वेता तिवारी झाली ‘भावूक’; म्हणाली – ‘तिनं मला मार खाताना पाहिलंय…!’
View this post on Instagram
शॅरन स्टोनने ब्रिटीश न्यूजपेपरला याबाबत खुलासा केला, की जेव्हा माझी सर्जरी पूर्ण झाली आहे आणि बँडेज काढले तेव्हा मला समजले की माझ्या छातीचा आकार वाढलेला आहे. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय माझी बॉडी बदलली. जेव्हा स्टोनने सर्जनला याबद्दल विचारले तेव्हा सर्जनने तिला सांगितले की, मला वाटले की मोठ्या साइजमध्ये ब्रेस्ट जास्त चांगले वाटतील.
View this post on Instagram
अक्षय कुमार चा ‘रामसेतू’ मधील फर्स्ट लूक झाला OUT !
शॅरन स्टोनला ‘बेसिक इन्स्टिंक्ट’ चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट १९९२ साली रिलीज झाला होता. या चित्रपटात शैरनने बरेच बोल्ड सीन्स दिले होते. तिने सांगितले होते की, बेसिक इस्टिंक्टमध्ये तिचे प्रसिद्ध सीन चित्रीत करण्यासाठी तिची फसवणूक झाली होती. तिने लिहिले की, बेसिक इन्स्टिक्टमधील ते सीन शूट केल्यानंतर मला पाहण्यासाठी बोलवले होते. यावेळी दिग्दर्शक, एजेंट्स आणि वकील सर्व उपस्थित होते. यातील बऱ्याच जणांचा चित्रपटाशी काहीही संबंध नव्हता. ही तीच वेळ होती जेव्हा मी माझ्या प्रायव्हेट पार्टचे शॉट पहिल्यांदा पाहिले होते. जेव्हा मला खूप आधी सांगितले होते की, आम्ही काहीच पाहू शकत नाही. फक्त तुला तुझी अंडरवेअर काढायची आहे. कारण व्हाइट रंगाच्या लाइटमुळे ते रिफ्लेक्ट होत आहे. त्यामुळे समजते आहे की तू अंडरवेअर परिधान केली आहे. शॅरन स्टोनने हेही लिहिले की, तिने स्क्रीनिंगनंतर दिग्दर्शकाच्या कानशिलात लगावली होती.
Discussion about this post