मुंबई : बॉलीवूडनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 हा रिअॅलिटी शो सध्या अंतिम टप्प्यात आहे. 14 फेब्रवारी रोजी बिग बॉसचा फिनाले टेलिकास्ट केला जाणार आहे. बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी घरात चढाओढ सुरु आहे. प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्पर्धकासाठी वोट करत आहे. या सीजनच्या विनरला घेऊन अनेक अंदाज लावले जाताना दिसत आहेत.
अशातच आता सलमान खानच्या खूप जवळच्यानं या गोष्टीवरून पडदा उचलला आहे. त्यानं बिग बॉसच्या विनरचं नाव सांगितलं आहे. सलमानचा हा खास आणि जवळचा व्यक्ती दुसरा तिसरा तिसरा कोणी नसून त्याचा बॉडीगार्ड शेरा आहे. शेरानं लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देताना या गोष्टीचा खुलासा केला आहे की, बिग बॉसची ट्रॉफी कोणता स्पर्धक नेणार आहे.
एका रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत बोलताना शेरानं सांगितलं की, सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉस 13 चा विनर होईल. बिग बॉसबद्दल बोलताना शेरा म्हणाला, “सिद्धार्थ शुक्ला माझा फेवरेट आहे. जर मी एखाद्या मुलीला किंवा महिलेला तिच्या आवडत्या स्पर्धकाबद्दल विचारलं तर ती सिद्धार्थ शुक्लाचंच नाव घेईल. प्रेक्षकांच्या मते सिद्धार्थाला हरवणं अशक्य आहे.” असंही तो म्हणाला.
Discussion about this post