बॉलीवूडनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्य सरकारने कडक निर्बंधही लावले आहे. बॉलिवूडमधीलही काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. आता ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, संजय लिला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली होती.
View this post on Instagram
दरम्यान, चाहत्यांना बप्पी लहरी कोरोनाबाधित असल्याचे समजताच ते लहरी लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. लहरी कुटूंबियांनी बप्पी लहरी यांच्या सम्पर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन केले आहे. बप्पी दा यांनी कोरोना नियमांचं पालन केलं आणि तेवढीच काळजीही घेतली मात्र तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे बप्पी लहरी यांची मुलगी रेमा लहरी बंसल हिनं सांगितलं
रेमा लहरी यांनी सांगितले की, बप्पी दा यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल बाधित म्हणून आला. त्यांचे वय विचारात घेता संपूर्ण कुटुंबानं त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लवकरच ते पुन्हा घरी येतील तसेच त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्याचेही रेमानं आभार मानले आहे.
Mirzapur च्या ‘माधुरी भाभी’ ने केले HOT फोटोशूट, आपल्या जबरदस्त अदांनी चाहत्यांना केले ‘घायाळ’
View this post on Instagram
View this post on Instagram
सोशल मीडियावर बप्पी लहरी यांनी १७ मार्चला एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी कोरोनाच्या लसीसाठी नोंदणी केल्याचं सांगितलं होतं. सोबतच ६० वर्षावरील सर्वांना तसंच ४५-५९ वयोगटातील नागरिकांनाही लस घेण्याचं आवाहन केलं होतं
Discussion about this post