बॉलीवूडनामा ऑनलाइन – अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस (Bigg Boss) स्पर्धक आणि स्टार डान्सर(Star Dancer) सपना चौधरी (Sapna Choudhary) जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव असते. सपना गेल्या काही दिवसांपासून पर्सनल लाईफमुळं चर्चेत येताना दिसत आहे. आता ती तिचा(Star Dancer) पती वीर साहू याच्यामुळं चर्चेत आली आहे.
सपनानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहे. यात ती पती सोबत दिसत आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच तिनं पतीचा वाढदिवस साजरा केला आहे. या फोटोत पुन्हा एकदा तिच्या मुलाचीही झलक पहायला मिळत आहे.
View this post on Instagram
सपनाचा हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी तिच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
4 ऑक्टोबर 2020 रोजी सपनाननं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सपनानं जानेवारी 2020 मध्ये बॉयफ्रेंड वीर साहू (Veer Sahu) सोबत एका मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत सिक्रेट मॅरेज केलं होतं. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या लग्नाची बातमी आणि फोटो समोर आले होते. 4 वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केलं. वीर साहू सिंगर, कंपोजर लिरीसिस्ट, अॅक्टर आहे. त्याला हरियाणाचा बब्बू मान म्हटलं जातं.
View this post on Instagram
सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.
Discussion about this post