बॉलीवूडनामा ऑनलाइन – मराठमोळी अभिनेत्री शर्वरी कुलकर्णीचे नुकतेच लग्न झाले असून तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे काही फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी तिच्या सर्व चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शर्वरीने शेअर केलेल्या या लग्नांच्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. खरंतर शर्वरीचे लग्न 21 फेब्रुवारीला झाले होते पण आता तिने लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ही बातमी दिली आहे. ‘लपवूनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे…’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
“मुखडा… हीचा मुखडा, जणू चंद्रावणी खुलला…”; ‘हा’ Video बघून सोनाली कुलकर्णीच्या प्रेमात पडले लोकं
या आधी शर्वरीने सोनी मराठी वाहिनीवरील ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.
Discussion about this post