बॉलिवूडनामा ऑनलाईन टीम : कॉमेडीयन कपिल शर्मा (Kapil Sharma) आपल्या फिटनेसची खूप काळजी घेत असतो. 2018 मध्ये त्याचं वजन अचानक वाढलं होतं ज्यानंतर या वर्षी कपिलनं आपलं 11 किलो वजन कमी केलं आहे. आधी तो 92 किलोचा होता आणि आता तो 82 किलोचा झाला आहे. सध्या कपिलचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत कपिल ट्रेड मिलवर धातवाना दिसत आहे तर त्याची आई देखील बालकनीत वॉक करताना दिसत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओत कपिल वर्कआऊट करताना दिसत आहे. सोबत त्याची आईदेखील वॉक करत आहे जी बालकनीत आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला दिल ये जिद्दी है गाणं सुरू आहे. सध्या कपिलचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. मायलेकाच्या वर्कआऊट व्हिडीओल चाहत्यांचीही मोठी पसंती मिळताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CIFdRw-hcAw/?utm_source=ig_embed
कपिल शर्मा पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याच्या घरी लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे. त्याची पत्नी गिनी चतरथ (Ginni Chatrath) आता दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. कपिल आणि गिनी यांनी 2019 मध्ये पहिल्या मुलीला जन्म दिला आहे. अनायरा शर्मा (Anayra Sharma) असं तिचं नाव आहे. अनायरा आता 11 महिन्यांची आहे. गिनी जानेवारी 2021 मध्ये आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. म्हणजे नवीन वर्षात कपिल शर्माच्या घरी आणखी एक नवीन पाहुणा येणार आहे. गिनीनं तिच्या प्रेग्नंसीचे 6 महिने पूर्ण केले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, कपिलची आई देखील सध्या मुंबईतच फॅमिली सोबत आहे. काही दिवसांपूर्वीच कपिलनं दिवाळीचे काही फोटो शेअर केले होते. यात गिनी खुर्चीच्या मागे उभी राहत बेबी बंप लपवताना दिसली होती.
Discussion about this post