बॉलीवूडनामा ऑनलाइन – नागिन 3 या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात खास जागा बनवणारी आणि नागिन(Nagin) 4 मध्ये झळकलेली अॅक्ट्रेस सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) इडंस्ट्रीतील सुंदर अॅक्ट्रेसपैकी एक आहे. सुरभी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. चाहत्यांसोबत ती कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आजवर तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. पुन्हा एकदा काही व्हिडीओंमुळं सुरभी चर्चेत आली आहे ज्यात ती परदेशातील रस्त्यावरून जाताना घसरून पडत आहे.
सुरभीनं तिच्या इंस्टावरून काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यात सुरभी खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिनं पांढऱ्या रंगाचा जड असा लेहंगा परिधान केला आहे. यात सुरभी चालता चालता मध्येच पडताना दिसत आहे. एकूण तीन व्हिडीओ आहेत ज्यात वेगळ्या अंदाजात पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ परदेशातील रस्त्यावरील आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ पाहून तुम्ही अवाक् झाले असाल तर जरा थांबा. कारण हे व्हिडीओ खरे नाहीयेत. म्हणजेच तिचं घसरून पडणं हे खरं नाहीये. तिचे हे व्हिडीओ तिच्या आगामी मालिकेच्या शुटींगमधील आहे. तिच्या चाहत्यांसाठी खुशखबरी आहे की, ती सध्या कुबूल है 2 मालिकेची शुटींग करत आहे. सध्या तिचे हे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.
सुरभीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं कुबूल है या टीव्ही मालिकेतून इंडस्ट्रीत पाऊल टाकलं होतं. यानंतर तिनं अनेक मालिकेत काम केलं आहे. सुरभीनं नागिन 3 आणि नागिन 4 मालिकेतही भूमिका साकारली आहे. सुरभी इक कुडी पंजाब दी, मंडे पटियाला दे यांसारख्या पंजाबी सिनेमात झळकली आहे. याशिवाय तिनं पंजाबी सीरीजमध्येही काम केलं आहे. परंतु तिला अॅक्ट्रेस म्हणून खरी ओळख कुबूल है आणि नागिन या मालिकेतून मिळाली. आता ती कुबूल है 2 ची शुटींग करत आहे.
Discussion about this post