बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी सिनेमामुळं चर्चेत आला आहे. शाहरुख खानचे त्याच्या पठाण (Pathan) सिनेमाच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडीओही अनेकदा समोर आले आहेत जे व्हायरल झाले आहेत. अलीकडेच त्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो खतरनाक स्टंट करताना दिसत आहे.
शाहरुखचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. असं सांगितलं जात आहे की, हा व्हिडीओ दुबईमधील आहे. त्याची प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत त्याचा अंदाज पाहून सारेच त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
शाहरुखला असा स्टंट करताना चाहत्यांनी कधीच पाहिला नाही. त्यामुळं हा व्हिडीओ सध्या सोशलवर जबरदस्त अटेंशन घेताना दिसत आहे. त्याचा स्टंट पाहून अंगावर काटा आल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.
शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. चाहत्यांनी त्याच्या या स्टंटचं कौतुक केलं आहे.
शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता लवकरच तो पठाण मध्ये दिसणार आहे. या सिनेमात त्याच्या सोबत दीपिका पादुकोण दिसणार आहे. याआधीही ही जोडी ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस, हॅप्पी न्यू ईयर अशा सिनेमात सोबत दिसली आहे.
Discussion about this post