बॉलीवूडनामा ऑनलाइन – पंजाबची कॅटरीना बिग बॉस 13 ची एक्स स्पर्धक अॅक्ट्रेस शहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill) हिचा आज 27 वा वाढदिवस आहे. यावेळी बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विनर सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि त्याची आई रितु शुक्ला हेही तिच्या सोबत उपस्थित होते. सिद्धार्थ आणि शहनाज यांच्या फ्रेंड्सनं मिळून मध्यरात्री खास अंदाजात तिचा वाढदिवस साजरा केला.
शहनाजनं तिच्या इंस्टावरून काही व्हिडीओ शअर केले आहेत जे तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे आहेत. व्हिडीओत दिसत आहे की, सिद्धार्थ शहनाजला आधी बर्थडे बंप्स देताना दिसत आहे. यानंतर मित्रांच्या सहाय्यानं तो तिला स्विमिंग पूलमध्ये फेकताना दिसतो.
View this post on Instagram
यानंतर शहनाज हसू लागते. नंतर ही घटना ती एन्जॉय करते. ती पूलमध्ये स्विमिंगचाही आनंद घेते. शहनाजनं एका हॉटेलता तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी सिद्धार्थ शुक्लासह तिचे काही मित्र उपस्थित होते. काही व्हिडीओत ती केक कापतानाही दिसत आहे.
View this post on Instagram
शहनाजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. चाहत्यांनी तिच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षावसुद्धा केला आहे.
Discussion about this post