बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड अॅक्ट्रेस नीतू कपूर (Neetu Kapoor) सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव्ह असतात. आपले फोटो आणि व्हिडीओ त्या कायमच सोशलवर शेअर करताना दिसतात. लवकरच त्या पडद्यावर दिसणार आहेत. नीतूचे पती दिग्गज अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी कॅन्सरसोबत लढा देत जगाचा निरोप घेतला. नीतू कायमच त्यांच्यासोबतच्या काही आठवणी शेअर करत असतात. अलीकडेच त्यांनी एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे जेव्हा त्यांनी पहिल्यांदाच ऋषी कपूर यांच्या सोबत डान्स केला होता.
नीतू यांनी त्यांच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी खास कॅप्शनही दिलं आहे. त्या लिहितात की, आमचा पहिला डान्स. व्हिडीओत नीतू आणि ऋषी हे 1975 साली आलेल्या जिंदा दिल सिनेमातील शाम सुहानी आई या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
नीतू यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. चाहत्यांनी त्याच्या डान्स आणि लुकचं खास कौतुक केलं आहे.
केवळ चाहतेच नाही तर अनेक सेलेब्सनही नीतू यांच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. मुलगी रिद्धीमा, मनीष मल्होत्रा, आलिया भटची बहीण शाहीन भट आणि मम्मी सोनी राजदान अशाही काही लोकांनी यावर कमेंट केली आहे.
नीतू यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दीर्घकाळानंतर नीतू पुन्हा एकदा अॅक्टींगमध्ये वापसी करणार आहेत. राज मेहताच्या जुग जुग जियो सनेमात त्या काम करताना दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्या सोबत अनिल कपूर, वरुण धवन कियारा आडवाणी हेही कलाकार आहेत.
Discussion about this post