बॉलीवूडनामा ऑनलाइन – ‘फँड्री’ फेम शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. ती नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ सिनेमात झळकली होती. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. या फोटोमध्ये राजेश्वरी खूप सुंदर दिसते आहे. राजेश्वरीने फेसबुकवर फोटो पोस्ट केला आहे. यातील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिला एका चाहत्याने थेट लग्नाची मागणी घातली आहे. चाहत्याच्या या मागणीवर राजेश्वरीने भन्नाट उत्तर दिले आहे. राजेश्वरीच्या या उत्तरामुळे तिची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.
Mithila Palkar ग्रीन कलरच्या गाऊनमध्ये दिसतेय फारच ग्लॅमरस
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
राजेश्वरी खरातच्या फोटोवर एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू बायको म्हणून घरी आली पहिजे.” चाहत्यांच्या या कमेंटवर राजेश्वरी म्हणाली, “आणि माझ्या आयुष्याचे काय” राजेश्वरीची ही कमेंट सध्या खूप व्हायरल होत आहे. राजेश्वरी कायम सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. राजेश्वरी नेहमी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटो किंवा व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसतो.
View this post on Instagram
फॅन्ड्रीनंतर राजेश्वरीचा ‘अॅटमगिरी’ हा सिनेमा आला होता. शालू साकारणारी राजेश्वरी खरात हिला नागराज यांनी पहिल्यांदा पुण्यात पाहिले होते. फॅन्ड्रीसाठी तिचा एकच चेहरा नागराज यांच्या डोळ्यांपुढे येत होता. पण तिचा शोध लागेना. अनेक प्रयत्नानंतर तिचा शोध लागला. पण पोरीला चित्रपटात काम करू देण्यास तिचे आईवडील तयार होईनात. नागराज यांनी बरीच समजूत काढल्यानंतर राजेश्वरीच्या आईवडिलांनी परवानगी दिली आणि राजेश्वरी कॅमेऱ्यापुढे उभी झाली.
Discussion about this post